Sunday, February 12, 2017

शिवराय त्याचे नाव

मध्यान्ही एक सुर्य तळपला
शिवराय त्याचे नाव
महाराष्ट्रभुमी उजळून आली
जयघोषती रंक आणिक राव
दरी डोंगरी अन दर्या वरी
पसरला तुज नावाचा डंका
उगवता स्वराज्य प्रभात
हादरली ती मोंगली लंका
तोडून पारतंत्र्याचे जोखड
तु वसविलेस राज्य रामाचे
आसनस्थ आमुच्या मनी झालासे
स्थापिलेस स्वराष्ट्र नव्या दमाचे
छत्रपती शिवाजी राजांचे चरणी अर्पण
– दर्शन

No comments:

Post a Comment