Sunday, February 12, 2017

रंग

फुलावे खेळकर लाल हिरवे
रंग बालपणी चे
पसरावे प्रगति चे रंग
आकाशी तरुणाई चे
वानप्रस्थी भरावे अनुभवी सांजरंग
जगावे आयुष्य ऐसे रंगांत होउनी दंग
घेउनी कुंचला हाती जीवनपट सजवावा
ऱेखाटुनी चित्रची नवे तो शामरंग खुलावा
-दर्शन

No comments:

Post a Comment