Sunday, February 12, 2017

पाऊस काल रात्रीचा

पाऊस काल रात्रीचा
गेला तुज आठवून
मनातली प्रतिमा तुझी
पाण्यात साठवून
हिंदोळ्यांवर वाऱ्याच्या
प्रतिबिंब तुझे हालले
थवे कृष्णमेघांचे
अस्ताकडे चालले
अवखळ तुझा स्पर्श जणू
ओलेती अवखळ मृदा
ओंजळीतले बिंब तुझे
प्राशुनी शांत क्षुधा
केसांत तुझ्या पसरले
पुष्पांचे अवघे रान
भिजलेला रानपक्षी
गातो तुझेच गान
ओल्या वाटेवरुनी
मन धावते व्याकुळलेले
सुगंधावरी तुझिया
पर्णजाल सळसळलेले
पाऊस काल रात्रीचा
भिजवून मनासी गेला
तुझ्या नयनांच्या चंद्रान्नी
सजवूनी रात्रीस गेला
– दर्शन

No comments:

Post a Comment