तु नक्की कुठे आहेस?
कुणा अंधाऱ्या मंड्पात सुरु असलेल्या भव्य दिव्य देखाव्या मागे लपला आहेस?
की
हजारो चमचम चमकणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात दिपला आहेस?
की
हजारो चमचम चमकणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात दिपला आहेस?
एकापेक्षा एक उंच मुर्त्यान्मागे लपलेल्या छोट्याश्या मुर्तित सामवला आहेस?
की
तुझ्या दर्शनासाठी दिवसरात्र अथक वाहत राहणाऱ्या भाऊ गर्दीत हरवला आहेस?
की
तुझ्या दर्शनासाठी दिवसरात्र अथक वाहत राहणाऱ्या भाऊ गर्दीत हरवला आहेस?
तु नक्की कुठे आहेस?
पाप पुण्या ने भरलेल्या हुंडी मध्ल्या ढिगाऱ्या चा हिशेब लावता लावता थकला आहेस?
की
काही पक्षमान्य मंडळांच्या नेत्यान्मधे कुणी लोकमान्य भेटीला येतील का या आशेवर डोळे लावून बसला आहेस?
पाप पुण्या ने भरलेल्या हुंडी मध्ल्या ढिगाऱ्या चा हिशेब लावता लावता थकला आहेस?
की
काही पक्षमान्य मंडळांच्या नेत्यान्मधे कुणी लोकमान्य भेटीला येतील का या आशेवर डोळे लावून बसला आहेस?
पण
कुठे तरी तु नक्की आहेस
आडगावातल्या एखाद्या म्हातारी ने घरी आणलेल्या छोट्याश्या मुर्ती मधे तु आहेस
आडगावातल्या एखाद्या म्हातारी ने घरी आणलेल्या छोट्याश्या मुर्ती मधे तु आहेस
आणि गरीब सवंगड्यान्नी हौस म्हणून झाडाखाली पुजलेल्या दगडामधेही तु आहेस
एखाद्या खेड्यात्ल्या मंदिरातून रम्य सांजवेळी ऐकू येणाऱ्या भजना मधे तु आहेस.
आणि डवरलेल्या पिकाला पाहून हरखुन गेलेल्या शेतकर्याने तुझ्यापुढे ठेवलेल्या त्या कणसा मधे तु नक्की आहेस.
बालकाने गिरवलेल्या पहिल्या अक्षरामधे तु आहेस आणि एखाद्या चित्रकाराच्या कुंचल्यातुन निघलेल्या फट्कार्यातही आहेस
गवैया ने छेडलेल्या मल्हारात तु आहेस आणि एखाद्या वीणेच्या झंकारातही तु आहेस.
आणि तु आहेस म्हणूनच तु पुढच्या वर्षी येशीलच हा विश्वास सुध्दा आहे. त्या मनातल्या विश्वासातही तुच आहेस.
तु नक्की कुठेतरी आहेस! नक्की…
– दर्शन
No comments:
Post a Comment