Sunday, February 12, 2017

उभा युगे अठ्ठावीस

पडघम तव नामाचे
आकाशी झडू लागले
श्वेतवर्णी हंस शेकडो
नभी उडु लागले
पाहीन त्यासी डोळा
ध्यास एकचि त्या लागला
केकारव तव नामाचा
जगती घुमू लागला
तु उभा युगे अठ्ठावीस
हात घेउनी कटी
खग जमले प्राशण्या
भक्तीरस चंद्रभागे तटी
धरून राउळा भोवती फेर
हंस घिरट्या घालती
नुरे आनंदा पारवार अवघा
पाउले पंढरीस चालती
तृष्णावल्या खगांची या
तुजवरी आगळीच प्रीती
चरणामृताचीच ही तृषा तुझिया
करावी घागर रिती
– दर्शन

No comments:

Post a Comment